Monday 28 April 2008

जात आरक्षण विशेषांकासंबंधी


जात : आरक्षण विशेषांकासंबंधी
मानसोपचारात रोग्याची पहिली अवस्था ``छे! मला कुठे काय झाले आहे!'' अशी नकाराची, Denial ची असल्याचे मानले जाते. भारतात जातिव्यवस्थेबाबत असे नकार फार दिसतात. मुळात जातिव्यवस्थेत ताणतणाव नव्हतेच, आज अस्पृश्यता पाळली जात नाही, सामाजिक तणावांमध्ये आरक्षण भर घालते, आरक्षणाने आज उच्च असलेली गुणवत्ता खालावेल - अनेक रूपांमधले नकार! मागे लॅन्सी फर्नांडिस आणि सत्यजित भटकळ यांच्या The Fractured Civilization या पुस्तकाच्या गोषवाऱ्यातून हे नकार नाकारायचा एक प्रयत्न आसुने केला. आता पुन्हा एक प्रयत्न करतो आहोत, टी.बी.खिलारे व प्रभाकर नानावटी यांच्या संपादनाखाली जात व आरक्षण या विषयावर एक विशेषांक काढून. सखोल व विस्तृत अभ्यासातून हा अंक संग्राह्य ठरेल, याची खात्री आहे.

- कार्यकारी संपादक

-------------------------------------------------------------------------------------------------
संस्थापक-संपादक दि.य देशपांडे

अतिथि-संपादक

टी.बी.खिलारे/प्रभाकर नानावटी

संपादक मंडळ - नंदा खरे (कार्यकारी), सुनीती देव, दिवाकर मोहनी

सल्लागार मंडळ : प्रमोद सहस्रबुद्धे, उत्तरा सहस्रबुद्धे, प्रभाकर नानावटी, टी.बी. खिलारे, रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ

विश्वस्त मंडळ : प्र.ब.कुळकर्णी, सुनीती देव, नंदा खरे, भरत मोहनी, ताहिरभाई पूनावाला, सुभाष आठले, मधुकर देशपांडे प्रस्तुत विशेषांक रु. ७५, किरकोळ अंक रु. २५.०० (टपालखर्च वेगळा)वार्षिक वर्गणी : व्यक्तीला रु. १७५.००, संस्थेला रु. २००.००परदेशीय वर्गणीदारांकरिता वार्षिक वर्गणी : व्यक्तीला २५ डॉलर, संस्थेला ३० डॉलर (अधिक वटणावळ) दहा वर्षांची आगाऊ वर्गणी देणाऱ्यांस बारा वर्षे अंक मिळेल.वर्गणी कृपया डिमांड ड्नफ्टने, मनीऑर्डरने किंवा चेकनेच पाठवावी. परगावाहून चेक पाठविल्यास वटणावळीकरिता रु. ५०.०० जास्त पाठवावेत. व्ही.पी.ची पद्धत नाही.मनीऑर्डर, चेक, ड्राफ्ट इ. आजचा सुधारकच्या नावे नागपूर पत्त्यावर पाठवावे.वर्गणी भरण्याची ठिकाणे :पोस्टाने आणि नागपूरमध्ये : मोहनीभवन, धरमपेठ, नागपूर-४४० ०१०.पुण्यामध्ये रोखीने : मिळून साऱ्याजणी, ४० ब, भोंडे कॉलनी, देवनाळकरांचा बंगला,अलुरकर म्यूझिक हाऊससमोर, कर्वे रोड, पुणे - ४११ ००४हे मासिक विद्यागौरी खरे यांनी श्याम ब्रदर्स, रामबाग रोड, गणेशपेठ, नागपूर येथे छापून मोहनीभवन, धरमपेठ, नागपूर ४४० ०१० येथे प्रकाशित केले. दूरभाष : अ.य.खरे : २५३१९४८ दिवाकर मोहनी : २५५८१२८, सर्व पत्रव्यवहार मोहनी-भवन, धरमपेठ, नागपूर - ४४० ०१० या पत्त्यावर करावा. ह्या मासिकात प्रकट झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.

1 comment:

Prakash Ghatpande said...

आजचा सुधारकचा हा विशेषांक कुठे मिळेल? अशी विचारणा झाल्याने माहिती देत आहे. सदर विशेषांक नागपुरला कार्यालयात मनिऒर्डर रु ७५ केल्यावर टपालाने मिळेल. पुण्यात हा अंक विकत घेण्यासाठी श्री प्रभाकर नानावटी यांचेकडे सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते ४ या वेळात दुरध्वनी क्र. ०२० २५६७०००४ यावर संपर्क साधावा. मुल्य रुपये ७५ आहे.