आमच्याविषयी



बुध्दिप्रामाण्यवादी तत्वचिंतक प्रा. दि. य देशपांडे

महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळींना आणि तत्वज्ञानाच्या अभ्यासकांना नेहमीच मार्गदर्शनासाठी लाभलेले प्रा. दि. य देशपांडे साऱ्यांनाच दि. य म्हणून परिचित होते. देशपांडे कुटुबींय तत्वज्ञानाला वाहिलेले म्हणूनही सर्वपरिचित होते. त्यांच्या पत्नी प्रा. म. ग. नातू आणि दि. य. यांचे आगरकर वाड्मयाच्या 3 खंडांच्या निर्मितीचे योगदानही सर्वमान्य झालेले होते. सेवानिवृत्तीनंतर 1978 पासून त्यांचे वास्तव्य नागपुरात होते. त्यांच्या मागे वहिनी प्रा. सुनीती देव व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
नागपूरच्य़ा मॉरेस कॉलेजमधून बी.ए. ला प्रथम आल्याबद्दल रॉर्बटसन सुवर्णपदक तर एम.ए. ला तत्वज्ञानात सर ऑर्थर ब्लेनर हॅसेट रौप्य पदक त्यांनी पटकाविले होते. यांनतर 1942-43 दरम्यान अमळनेरच्या भारतीय तत्वज्ञान संस्थेत ते संशोधक म्हणून होते. सांगलीचे विलिंग्डन महाविद्यालय व जबलपूरच्या रॉर्बट्सन महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून कार्य केल्यानंतर अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. 1989 मध्ये स्थापन केलेल्या नागपूरला इंडियन फिलॉसॉफिकल असोसिएशनचे ते संस्थापक-अध्यक्ष होते. इंडियन फिलॉसॉफिकल कॉंग्रेसच्या पुणे येथील अधिवेशनाचे तर दिल्ली येथील सुवर्णमहोत्सवी अधिवेशनाचेही ते विभागीय अध्यक्ष होते. नागपूर विद्यापीठात सांकेतिक तर्कशास्त्र हा विषय सुरु करण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता.
द टूथ अबाउट गॉड, एथिक्स फॉर एव्हरीमॅन, वुमेन, फॅमिली अड सोशालिझम, देकार्त:  चिंतने अशी डझनावरी त्यांची पुस्तके प्रसिध्दी होती. देशभरातील तत्वज्ञानाला वाहिलेल्या नियतकालिकांमधून त्यांचे अनेक निबंध प्रसिध्द झाले होते.

No comments: